प्रगाढ पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या विराट नगरीमध्ये त्यांच्याच नावाने सुरू असलेले ‘ ‘ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय वाई ‘ म्हणजे पूर्वाश्रमीचे वाई हायस्कूल ! या विद्यालयाची माहिती जागतिक पटलावर मांडताना मला मनापासून आनंद होत आहे.
हे आपले विद्यालय तालुक्यातील इयत्ता दहावीला सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणारे, वर्षातील 365 दिवस सुरू असणारे, इयत्ता दहावीच्या परीक्षेत 90% च्या वर गुण मिळवणाऱे जास्त विद्यार्थी दरवर्षी देणारे, त्याचबरोबर कला, संगीत, वक्तृत्व आणि क्रीडा प्रकारांमध्ये नेहमी अग्रेसर असणारे विद्यालय आहे.