तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई या विद्यालयातील इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्यांची सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये वार्षिक शैक्षणिक सहल पुणे दर्शन साठी काढण्यात आली. या शैक्षणिक सहली मध्ये एकूण 115 विद्यार्थी व 8 शिक्षक सहभागी झाले होते. शैक्षणिक सहल एसटी महामंडळ बस ने दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाली. बनेश्वर -स्वामीनारायण मंदिर- राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज- इस्कॉन टेम्पल- केळकर संग्रहालय -बालाजी हा सहल मार्ग सहलीसाठी निवडला होता.
बनेश्वर- या ठिकाणी प्राचीन शिवमंदिर आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिवमंदिर परिसरात आनंद घेतला व शिवशंकराचे दर्शन घेतले.
स्वामी नारायण मंदिर- या ठिकाणी श्री स्वामीनारायण यांचे अति उत्कृष्ट असे मंदिर आहे. हे मंदिर अतिसुंदर व प्रशस्त आहे.
राजीव गांधी प्राणी संग्रहालय- या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी विविध पशु, पक्षी व प्राणी यांचे दर्शन घेतले व ते पशुपक्षी, प्राणी कशा प्रकारे बंदिस्त स्वरूपामध्ये आहेत याचा अनुभव घेतला.
इस्कॉन मंदिर- हे मंदिर प्राचीन मंदिर आहे व श्रीकृष्ण भक्त सर्वजण श्रीकृष्ण दर्शनासाठी या मंदिराकडे येतात.
केळकर संग्रहालय- या संग्रहालयामध्ये विविध प्राचीन ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना दिली गेली.
बालाजी – बालाजी हे नसरापूर पासून नजीकच्या अंतरावर एक सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तिरुपती बालाजी या मंदिराचे प्रति रूप म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.