प्रगाढ पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या विराट नगरीमध्ये त्यांच्याच नावाने सुरू असलेले ‘ ‘ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय वाई ‘ म्हणजे पूर्वाश्रमीचे वाई हायस्कूल ! या विद्यालयाची माहिती जागतिक पटलावर मांडताना मला मनापासून आनंद होत आहे.
हे आपले विद्यालय तालुक्यातील इयत्ता दहावीला सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणारे, वर्षातील 365 दिवस सुरू असणारे, इयत्ता दहावीच्या परीक्षेत 90% च्या वर गुण मिळवणाऱे जास्त विद्यार्थी दरवर्षी देणारे, त्याचबरोबर कला, संगीत, वक्तृत्व आणि क्रीडा प्रकारांमध्ये नेहमी अग्रेसर असणारे विद्यालय आहे. अशाप्रकारे “Education means development of three ‘H’ i.e. Head, Hand and Heart” या म. गांधीजींच्या शिक्षणाच्या व्याख्येनुसार सर्वच क्षेत्रात गुणवत्तापूर्ण दबदबा असलेले विद्यालय ही विद्यालयाची ख्याती सर्वश्रुत आहे.
1965 सालापासून म्हणजेच विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा सर्वांगीण प्रगतीचा आलेख हा चढता राहिलेला आहे ; याचे श्रेय प्रामुख्याने विद्यालयात शिक्षण घेतलेल्या आणि घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आणि विशेषता विद्यालयाचे आजवरचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,नियोजनातील बारकावे जपणारे पर्यवेक्षक,अभ्यासू शिक्षक,मेहनती शिक्षकेतर कर्मचारी यांना जाते.तसेच वेगवेगळ्या प्रसंगी होणारे संस्था निरीक्षक यांचे मार्गदर्शन आणि संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ यांचा पाठिंबाही तितकाच मोलाचा आहे.
सर्वांच्याच प्रयत्नातून आणि सहकार्यातून विद्यालयांमध्ये शिक्षण घेणारां विद्यार्थी हा उद्याचा ‘जागतिक नागरिक’ बनवण्यासाठी विद्यालयामध्ये जे विविध उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात त्या माहितीची जागतिक स्तरावर देवाणघेवाण करण्यासाठीच हा आमचा प्रयत्न…
Recent Comments