विज्ञान हा जिज्ञासा निर्माण करणारा विषय आहे. जो ज्ञानाच्या शाखेचा विस्तार करतो, निरीक्षण आणि प्रयोगाद्वारे भौतिक आणि नैसर्गिक जगाची रचना आणि वर्तन तपासतो. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीची रुजवणूक व्हावी, यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांमध्ये विज्ञान विभागामार्फत विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बाह्य परीक्षा, विज्ञान वक्तृत्व व निबंधस्पर्धा, व्याख्याने, विज्ञान मेळावा, विज्ञान हस्तलिखित, विज्ञान प्रतिकृती, विज्ञान प्रदर्शन, क्षेत्रभेट यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सायन्स ऑलंपियाड फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ज्योतिरादित्य शिवाजी निकम इयत्ता
दहावी या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ८७ वा क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच मॅथ्स ऑलंपियाड मध्ये कु. वेदांतिका दिगंबर पवार या विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय पातळीवर १२० वा क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. सायन्स टॅलेंट सर्च कॉम्पिटिशन मध्ये इयत्ता दहावीतील दोन विद्यार्थिनींनी उज्वल यश संपादन केले.
विद्यालयात विज्ञान छंद मंडळा अंतर्गत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यादरम्यान विविध प्रयोगांमधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा संदेश देऊन शपथ घेण्यात आली. २८ फेब्रुवारी हा विज्ञान दिन विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. इयत्ता नववीतील विद्यार्थीनींनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले.
Recent Comments