यशतीर्थ 2023/24
संगणक प्रयोगशाळा नेट कनेक्टिव्हिटी सह 35 प्रणाली आणि सर्व्हर सह सुसज्ज आहे.मुलांना इयत्ता 5 वी ते 8वी पर्यंत संगणकाच्या जगाची ओळख करून दिली जाते.आणि विद्यार्थी अभ्यासक्रमाचे पालन करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनदिन गरजांसाठी संगणकाचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच ,संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून नियमित शैक्षणिक अध्यापनात शिकवल्या जाणाऱ्या संकल्पनांना बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अध्यापनात तंत्रज्ञानाची सांगड घालण्यासाठी शाळेत , विविध विषय सुधारित आणि विस्तृत पध्दतीने समजावून सांगण्यासाठी डिजिटल लॅबचा वापर करतात.
सन 2023/24 या शैक्षणिक वर्षामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक समारंभाचे औचित्य साधून विद्यालयात संगणक प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी वर्षभरातील विविध उपक्रमावर उत्कृष्ठ स्लाईड तयार करून दाखविले.
संगणक शिक्षिका
निलम जगताप
Recent Comments