आपल्या विद्यालयात समाजशास्त्र विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक भौगोलिक पर्यावरण विषयक आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम वर्षभर राबवित असतो. ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत मेणवली या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नेऊन माहिती देण्यात आली. महर्षी शिंदे विद्यालय, वाई या ठिकाणी भरवण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी भेट दिली व जुन्या काळातील शस्त्रांची माहिती घेतली. त्याचबरोबर विश्वकोश कार्यालयास भेट, मेणवली या ठिकाणी आलेले फिरते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास भेट देऊन विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.
Recent Comments